
इचलकरंजी | शाब्दिक वादात मधे आल्याच्या कारणावरुन धक्काबुक्कीसह शिवीगाळ करत कोयत्याने डोक्यात मारल्याने एकजण जखमी झाला. या प्रकरणी हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या संदेश कापसे (रा. गावभाग) आणि ओमकार पोवार (रा. येलाज मळा) यांच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आकाश राजाराम लंगोटे (वय २७ रा. पि. बा. पाटील मळा) याने फिर्याद दिली आहे. दरम्यान, अटक केलेल्या संदेश कापसे याच्यावर हद्दपार कारवाईचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला कर्नाटक राज्यात सोडण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, म्हसोबा ग‘ी चौकात होम मिनिस्टर कार्यक‘म सुरु होता. त्यावेळी आकाश लंगोटे हा मित्रासमवेत हा कार्यक‘म पाहत होता. त्याचवेळी त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या संदेश कापसे व ओमकार पोवार यांच्यात काही कारणावरुन शाब्दिक वाद सुरु झाला. तो पाहण्यासाठी आकाश गेला असता संदेश याने त्याला तु मधे का पडतोस असे म्हणत धक्काबुक्की करत शिवीगाळ करत ढकलून दिले. त्यानंतर दुचाकीवरुन जाताना बघून घेतो अशी धमकीही दिली. तर काही वेळानंतर संदेश व ओमकार हे परत आले व त्यांनी आकाश याला पुन्हा शिवीगाळ करु लागले. तर ओमकार याने दुचाकीच्या डिकीतून कोयता काढून तो संदेशच्या हातात दिला.
वाद सुरु असतानाच संदेशने आकाशच्या डोक्यात कोयत्याने मारल्याने तो जखमी झाला. ते पाहून संदेश व ओमकार यांनी तेथून पलायन केले. गावभाग पोलिसांनी या प्रकरणी संदेश कापसे याला अटक केली. हद्दपारीची कारवाई केली असतानाही तो शहरात मिळून आल्याने त्याच्यावर हद्दपार कारवाईचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता जामिन मंजूर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला कर्नाटक राज्यात नेऊन सोडले.