बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांचा जल्लोष; अनेक कॉलेजांनी मिळवला उज्ज्वल यश

📍इचलकरंजी : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच इचलकरंजीतील शिक्षणसंस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, शहरातील चार शाळांनी यावर्षीही 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत आपले शैक्षणिक वर्चस्व सिद्ध केले आहे.
ही शाळा राहिल्या 100 टक्के यशस्वी:
- इचलकरंजी हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज
- बिशप्स इंग्लिश स्कूल (54 विद्यार्थी)
- व्यंकटराव हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज
- व्यंकटेश्वरा हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, कबनूर
निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, दुपारी 1 वाजता इंटरनेटवर निकाल जाहीर झाला आणि शहरातील नेट कॅफे, मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची गर्दी उसळली. काहींनी आनंदात मिठाई वाटली, तर काहींच्या डोळ्यांतून समाधानाश्रू ओघळले.
शहरातील इतर महाविद्यालयांचा टक्का पुढीलप्रमाणे:
- तात्यासो मुसळे हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज – 99.71%
- श्री बालाजी माध्यमिक विद्यालय – 99.61%
- मणेरे हायस्कूल – 99.00%
- नॅशनल हायस्कूल – 98.60%
- श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल – 96.24%
- ताराबाई गर्ल्स हायस्कूल – 96.15%
- आक्काताई रामगोंडा पाटील कॉलेज – 95.00%
- गोविंदराव हायस्कूल – 92.37%
- कबनूर हायस्कूल – 85.71%
- रत्नदिप हायस्कूल – 82.14%
- दत्ताजीराव कदम एएससी कॉलेज – 80.29%
मयूर गर्ल्स, गर्ल्स हायस्कूल ऑफ कॉमर्स, दि न्यू हायस्कूल, नाईट कॉलेज आर्ट्स अॅन्ड कॉमर्स यांचाही निकाल समाधानकारक असून त्यांनीही उज्वल निकालाची परंपरा राखली आहे.
🔸 विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले, अशी भावना महाविद्यालय प्रशासनांनी व्यक्त केली आहे.