
इचलकरंजी (दि. ०३) : २०१४ साली १९ गॅस सिलेंडर व टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेल्या मस्जिद अलाउद्दीन मुल्ला या आरोपीची प्रथमवर्ग न्यायालय, इचलकरंजी येथे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
तत्कालीन एलसीबी पथकाने कबनूर येथून आरोपीला अटक करून त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. २०१६ मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. खटल्यादरम्यान पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व पोलीस अधिकारी असे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले.
आरोपीच्या वतीने ॲड. रियाज रफीक बाणदार यांनी काम पाहिले. त्यांनी साक्षीदारांची उलटतपासणी करून संपूर्ण मुद्देमाल १०x१४ च्या खोलीत ठेवणे अशक्य असल्याचे न्यायालयात प्रभावीपणे मांडले. तपासात झालेल्या त्रुटीही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
त्यानुसार न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात ॲड. बाणदार यांना ॲड. सचिन कोरवी, ॲड. सुहेल बाणदार, ॲड. यासिन पेंढारी व परवेज मुजावर यांनी सहाय्य केले.