शेळके मळा, काळा ओढा, बागवान पट्टी परिसराची पाहणी; नागरिकांच्या अडचणी जाणून तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश

📍 इचलकरंजी : शहरातील संभाव्य पूरग्रस्त भागांची आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी पाहणी केली. त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महापूराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके आणि अडचणींचा आढावा घेण्यात आला.
सन २०१९ आणि २०२१ मधील महापुराचा अनुभव लक्षात घेऊन आयुक्त पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी संबंधित विभागांसह बैठक घेतली होती. त्यानंतर ही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणीत शेळके मळा, बागवान पट्टी, स्वामी समर्थ मंदिर, मुजावर पट्टी, काळा ओढा परिसर, पि.बा.पाटील मळा व माऊली मंदिर या भागांचा समावेश होता.
📌 नागरिकांचे थेट संवादातून प्रश्न जाणले
पाहणी दरम्यान आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधून पूरस्थितीत येणाऱ्या अडचणी आणि गरजा जाणून घेतल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींनी समस्यांचे सविस्तर वर्णन करत उपाययोजना सुचविल्या.
🛠️ तातडीच्या कारवाईचे आदेश
पाहणीनंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी संबंधित विभाग प्रमुखांना तातडीने उपाययोजना हाती घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
🔹 पाहणी वेळी उपस्थित मान्यवर:
माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, पापालाल मुजावर, सहा आयुक्त विजय राजापुरे, अभियंता महेंद्र क्षिरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगेवार, नगररचनाकार हरिश्चंद्र पाटील यांच्यासह अनेक विभागप्रमुख आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.