
इचलकरंजी | येथील जेष्ठ पत्रकार आणि वृतपत्र विक्रेते चिदानंद आलुरे (वय 60) यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांनी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषवले हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, जावई आणि आई असा परिवार आहे.
आलुरे यांनी शालेय जीवनापासून वृतपत्र विक्रीचा व्यवसाय सुरु केला हाेता. त्यानंतर काही काळ ते दैनिक तरुण भारत (बेळगाव) चे आणि सध्या दैनिक जनप्रवास चे इचलकरंजी प्रतिनिधी म्हणून काम करत हाेते. दुपारी सांगली मार्गावरील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते, नातेवाईक सहभागी झाले हाेते. रिंगराेडवरील लिंगायत रुद्रभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शाेकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. साेमवार 26 राेजी सकाळी 9 वाजता माती सावडण्यात येणार आहे.