
इचलकरंजी | शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नागरीक मंचच्या शिष्टमंडळाने उपायुक्त नंदु परळकर यांची भेट घेतली. यावेळी गेल्या 8-10 वर्षांत भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी माेहिमेसाठी किती खर्च झाला आणि त्याचे परिणाम काय झाले? यासह विविध प्रश्न उपस्थित करत नसबंदी माेहिमेतील सततच्या अभावामुळे भटकी कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गांभीर्याने नसबंदी माेहिम राबवण्याकडे दुर्लक्ष करणाèया अधिकाèयांची चाैकशी करुन जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही केली.
शहरात भटक्या कुत्र्यांमुळे लहान-माेठे अपघात नित्याचे झाले असून नुकताच पंचगंगा नदीत पुण्याच्या युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इनामंच्या शिष्टमंडळाने उपायुक्त परळकर यांची भेट घेतली. यावेळी नदीतील खाेलगट भागाचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे उपाय म्हणून घाटाच्या डाव्या बाजुस धाेकादायक क्षेत्र असल्याची माहिती देणारे सुचनाफलक तातडीने लावण्याची मागणी केली. तसेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका विद्यार्थिनीच्या दाेन्ही हाताला, डाेक्याला इजा झाली असून जबड्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरीक त्रस्त असून भटक्या कुत्र्यांच्या बंदाेबस्ताची मागणी हाेत आहे. त्यामुळे गेल्या 8-10 वर्षांत भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी माेहिमेसाठी किती खर्च झाला आणि त्याचे परिणाम काय झाले?, नसबंदी माेहिमेत सातत्य आहे काय ? यासह अनेक प्रश्न उपस्थित करत माेहिमेत सातत्याच्या अभावामुळेच कुत्री नागरीकांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे नसबंदी माेहिम गांभीर्याने राबवण्याकडे दुर्लक्ष करणाèया अधिकाèयांची चाैकशी करुन जबाबदारी निश्चित करण्याची आणि मुख्यमंत्र्यांच्या र्दाैयावेळी राबवलेल्या अतिक्रमण निमुर्लन माेहिमेप्रमाणे कायमस्वरुपी अतिक्रमण निर्मुलनाची माेहिम राबवण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी उपायुक्त परळकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण माेहिमेत आणि अतिक्रमण निर्मुलन माेहिमेत सातत्य ठेवु तसेच नदीपात्रात तातडीने सूचनाफलक लावण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात अभिजीत पटवा, महेंद्र जाधव, उदयसिंह निंबाळकर, अमित बियाणी, हरीश देवडिगा, दीपक पंडित, जतीन पाेतदार यांचा समावेश हाेता.