
इचलकरंजी | येथील श्री आदिनाथ को-ऑप बँक लि., इचलकरंजी या बँकेची सन २०२४-२५ सालाची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी मराठा मंडळ सांस्कृतिक भवन, डी मार्ट शेजारी, तांबे माळ, इचलकरंजी येथे खेळीमेळीत पार पडली.
सुरुवातीस आद्यतिर्थकर आदिनाथ भगवान व संस्थापक स्व. आप्पासो मगदूम यांचे फोटोचे पुजन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन सुरूवात झाली.
उपस्थितांचे स्वागत संचालक श्री. श्रेणिक दादासो मगदूम यांनी केल, तर श्रध्दांजली ठराव संचालक श्री. मधुकर देवाप्पा मणेरे यांनी मांडला. सभेस प्रमुख अतिथी म्हणून सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा), माजी मंत्री प्रकाश आवाडे (आण्णा) आमदार डॉ. राहुल आवाडे आदी उपस्थित होते. तदंनतर नोटीस वाचन मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. जयकुमार उपाध्ये यांनी केले. सभासदांनी सर्व विषयास एकमताने टाळयाच्या गजरात मंजूरी दिली.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन मा. सुभाष आदिशा काडाप्पा यांनी ८% डिव्हीडंड जाहिर केला. तसेच आतापर्यंतचा डिव्हीडंड परतावा पाहता १ हजार रूपयाच्या शेअर्स रक्कमेवर २४४० इतका डिव्हीडंड परतावा बँकेने दिलेला आहे. त्याचबरोबर अहवाल सालातील बँकेच्या आर्थिक बाबींचा आढावा सभासदांसमोर मांडला. बँकेच्या वैशिष्ट्यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे दरवेळी निवडणूक बिनविरोध होते आणि प्रत्येक वार्षिक सभेस आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांची प्रकृती कशीही असेल तर आवर्जून उपस्थित असतात. त्याचप्रमाणे बँकेने अहवाल सालात १ कोटी ७९ लाख इतका ढोबळ नफा तर तरतुदी वगळून ७७ लाख ७० हजार इतका निव्वळ नफा मिळविलेला आहे.
कर्जदार सभासदांना आपली कर्ज खाती रेग्यूलर ठेवावीत असे आव्हान केले तसेच अनियमित कर्जदारावर नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करावी लागते या बाबत खेद व्यक्त केले. तसेच बँकेने आण्णासाहेब पाटील महामंडळा च्या माध्यामतून एकूण १३५ सभासदांना १८ कोटी इतके कर्ज वितरण करून अर्थसहाय्य उपलब्ध केलेले आहे. इतर ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. आम्ही ग्राहकांना मोबाईल बँकींगच्या माध्यमातून आयएमपीएस सुविधा व एटीएम क्यु आर कोड, युपीए सुविधेचा लाभ देत आहोत.
प्रमुख मार्गदर्शनामध्ये आदरणीय प्रकाश आवाडे (आण्णा) यांनी स्वः आप्पासो मगदूम यांचा काळ म्हणजे संघर्षांचा काळ होता असे नमूद करून जुन्या आठवणींना उजाळा दिला कठोर शिस्त हा त्याचा स्वभाव होता म्हणुन आज बँक दिमाखाने व विश्वासाने परिसरात उभी आहे समकालीन बँकेमध्ये आदिनाथ बँकेचा सर्वोत्कृष्ठ बैंक म्हणून गौरव केला
बँकींगमधील आव्हानावरती बोलताना आज छोटया बँकांना सायबर सेक्युिरीटी तंत्रज्ञान व त्यावरील होणारा खर्च हे मोठे आव्हान असलेचे नमूद केले. तसेच यासाठी व्यवसाय वाढविणे, नफा वाढविणे व कार्यक्षम बँकींग करणे गरजेचे आहे असा बहुमोल मंत्र दिला बँकेमध्ये नविन तंत्रज्ञानामुळे गर्दी कमी झाली आहे व आजचा ग्राहक नविन सुविधा घरबसल्या बँकींग वापरणारा आहे असे नमूद केले.आण्णासाहेब महामंडळ सारखी अजून 8 महामंडळे असून त्या सर्व आपल्या सभासदांसाठी सुरू करा व सभासदांचे कल्याण करा तसेच महिलांसाठी नविन योजना राबवाव्यात अशी सुचना मांडली. शेवटी बँकेच्या कामकाजाबद्दल कौतुक केले व बँकेच्या पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या.
सभेमध्ये मंचावरील उपस्थितीत मान्यवरांचा विशेष सत्कार करणेत आला. त्यामध्ये मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) मा.प्रकाश आवाडे (आण्णा) व नूतन आमदार डॉ राहुलजी आवाडे यांचा सत्कार चेअरमन काडाप्पा यांनी केला तसेच नूतन व्हा. चेअरमन म्हणून चंद्रकांत मगदूम तर नवमहाराष्ट्र सुत गिरणी येथे चेअरमन म्हणून अभयकुमार मगदूम तर संचालक म्हणून मधुकर मणेरे, शिवाजी पाटील, राजेश पाटील याची निवड झालेने याचा सत्कार करणेत आला तसेच श्रीकृष्ण दुध संस्था नूतन चेअरमन बाबासो रूग्गे याचा तर आदर्श ग्राहक म्हणुन श्री. बाळासाहेब गोपाळ बोंद्रे यांचा त्याचप्रमाणे आदिनाथ बँकेमधील उत्तम सेवा बजावलेने श्री जिवंधर चौगुले यांचा तसेच नूतन सीईओ जयकुमार उपाध्ये व नूतन असि सीईओ निलेश बागणे, संतोष रायनाडे यांचा व आदर्श कर्मचारी म्हणुन पंकज वसवाडे व महावीर संकाण्णा यांचा सत्कार करणेत आला. तसेच उत्कृष्ठ शाखा म्हणून शाखा माणगाव या शाखेस रक्कम रू. ११,०००/- व शिल्ड देणेत आले. तसेच पत्रकार श्री. रविंद्र पाटील व शिवाजी काळे यांचाही सत्कार करणेत आले.
शेवटी व्हा. चेअरमन चंद्रकांत मगदूम यांनी सभासदांना सर्व विषयास मंजूरी दिल्याने व आवाडे परिवाराचे बँकेस कायमपणे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले. सदर सभेस संचालक बाळासाहेब चौगुले, कुंतिलालजी पाटणी, अभयकुमार मगदूम, सुदर्शन खोत, अनिल बम्मण्णावर, संपत कांबळे गुरूनाथ हेरवाडे, सुचित हेरवाडे, तसेच संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले, बीओएम सदस्य उमेश कोळी, अॅड. पवनकुमार उपाध्ये तसेच माजी चेअरमन श्री बाळासो सिध्दाप्पा चौगुले, डॉ. पारीसा बडबडे, शंकर हजारे, चवगोंडा लडगे, सतिश मगदूम तसेच सभासद दादासो मगदूम, शांतीनाथ मगदूम, मोहन चौगुले, महावीर बरगाले, शामराव नकाते, मिलीद कोले, आर. के. पाटील, महावीर कोल्हापुरे, प्रकाश चौगुले उपस्थित होते.
सभेचे सुत्रसंचालन श्री. तिर्थकर माणगांवे यांनी केले.