
इचलकरंजी/प्रतिनिधी
अहवाल सालात संस्थेला सर्व खर्च वजा जाता ७२.११ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना यावर्षीही १५ टक्के डिव्हिडंड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्थेला अहवाल सालात कोल्हापुर जिल्हा कार्यक्षेत्राची मान्यता मिळाली असल्याची माहिती इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेचे चेअरमन सूर्यकांत साखरे यांनी दिली.
येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून चेअरमन साखरे बोलत होते.
सुरुवातीस ज्येष्ठ संचालक विलासराव गाताडे यांनी स्वागत करून संस्थेच्या ४० वर्षाचा कार्याचा आढावा घेतला. संचालक बाळासाहेब बरगाले यांनी आदरांजली वाहणेचा ठराव मांडलात्यानंतर चेअरमन श्री. साखरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत संस्थेचे वसुल भाग भांडवल ८७.५० लाख असुन राखीव व इतर निधी ५.२४ कोटी, ठेवी १८.६४ कोटी, गुंतवणुक ८.८४ कोटी, येणे कर्ज १६.६६ कोटी आहे. संस्थेची थकबाकी नाममात्र ००.६६ टक्के इतके असून नेट एनपीए शून्य टक्के आहे. संस्था १२ वर्षे सलग १५ टक्के डिव्हिडंड देत असल्याचे नमूद केले.
विषयपत्रिका व नोटीस वाचन व्यवस्थापक विश्वनाथ रोडे यांनी केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. याप्रसंगी जवाहर छाबडा यांची महाराष्ट्र राज्य सहकार भारती विभागीय संघटक, सौ. सुषमा पाटील यांची कोल्हापुर जिल्हा महिला प्रमुख, विजय कामत यांची इचलकरंजी महानगर सहकार भारती अध्यक्ष, चेअरमन सुर्यकांत साखरे यांची पतसंस्था प्रकोष्ठ, व्यवस्थापक विश्वनाथ रोडे यांची महामंत्री तसेच माजी नगरसेवक श्रीरंग खवरे यांची इचलकरंजी भाजप पूर्व शहर अध्यक्ष, बाळासो माने यांची भाजप ग्रामीण अध्यक्ष म्हणुन निवड झालेबद्दल यांचा सत्कार भगतराम छाबडा यांच्या हस्ते करणेत आला.
सदसभेस राजगोंडा पाटील, गजानन लोंढे, संचालक इरगोंडा पाटील, चंद्रकांत बिंदगे, राजेंद्र शिरगुप्पे, राजकुमार पाटील, दशरथ मोहिते, शोभा कडतारे तसेच दत्तात्रय कुंभोजे, नंदु पाटील, विलास कोरवी, बंडोपंत लाड, सुरेश कोल्हापुरे, शंकरराव घेवडे, अॅड. डी. के. कंदले, वसुली अधिकारी दिपक लाखन, संस्थेचे संचालक सर्वश्री दिलीप वणकुदे, सुभाष तोडकर, शशिकांत शेटके, विलास चव्हाण, सुभाष पाटील, नकुल झेले, सौ. सुवर्णा म्हेतर, सौ. भारती शिंदे, तज्ञ संचालक अमर सडगर, धन्यकुमार पाटील, शाखा सल्लागार सागर मुसळे सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट उपस्थित होते.