
इचलकरंजी/प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील द लक्ष्मी विष्णू सहकारी बँक लिमिटेड यांच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कारवाई करत २०,००० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. केवायसी (KYC) संदर्भात आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
आरबीआयने दिनांक १७ जुलै २०२५ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली असून, महाराष्ट्रातील आणखी एक म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे यांच्यावरही २.१० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. याशिवाय गुजरातमधील दोन बँकांवरसुद्धा अशाच स्वरूपाची कारवाई झाली आहे.
आरबीआयच्या ‘लोन्स अँड अॅडव्हान्सेस टू डायरेक्टर्स, देअर रिलेटिव्ह्स अँड कन्सर्न्स’ या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
फोटो, गुगल साभार