
इचलकरंजी | इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व युवा नेते श्री. अमितराव गाताडे यांचा वाढदिवस शुक्रवार, दिनांक 26 सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार.
या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण, आयजीएम रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप, तसेच इतर उपक्रम तसेच या कार्यक्रमांना ज्येष्ठ कामगार नेते श्री. शामराव कुलकर्णी, शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, युवक प्रदेश सचिव परवेज गैबान यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ व माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून, पक्षवाढीसाठी सातत्याने कार्य करणारे श्री. गाताडे यांनी कार्याध्यक्ष पदाची धुरा सुरुवातीपासूनच सांभाळली आहे. गोरगरिबांना मदत, रुग्णसेवा, कामगार व झोपडपट्टीतील कष्टकरी वर्गाला दिलासा देणे, हे त्यांनी हसन मुश्रीफ फाउंडेशन, नितीन जांभळे फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सातत्याने केले आहे.
शहरातील विविध प्रभागांमधील समस्या सोडवण्यासाठी ते अविरत प्रयत्नशील राहतात. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे युवकांमध्ये उत्साह आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमित गाताडे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी गणेश ऑइल मिल येथे उपस्थित राहणार आहेत.
