
इचलकरंजी, (दि.०२ ) : डीकेटीई टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या एकूण ११ पदवी अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडिटेशन (NBA) कडून मानांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये यावर्षी एमबीए, सिव्हील आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग या प्रमुख कोर्सेसचाही समावेश आहे.
एनबीए ही भारतातील शैक्षणिक संस्थांच्या दर्जाचे मूल्यांकन करणारी स्वायत्त संस्था असून, त्यांच्याकडून मिळणारे मानांकन ही गुणवत्तेची खात्री मानली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातून एमबीए अभ्यासक्रमाला एनबीए मानांकन मिळवणारी डीकेटीई ही एकमेव संस्था ठरली आहे.
संस्थेतील ७० हून अधिक पीएच.डी. धारक प्राध्यापक, १२० हून अधिक संशोधन लेखांचे प्रकाशन, उत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड, आधुनिक प्रयोगशाळा व उद्योगांसोबत असलेली भागीदारी यामुळे हे यश मिळवता आले.
या यशात संस्थाध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, संचालिका डॉ. आडमुठे व संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. एनबीए समितीने संस्थेच्या कार्यप्रणालीचे विशेष कौतुक केले.
प्रतिनिधी – विनायक कलढोणे