
इचलकरंजी/प्रतिनिधी – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दिनांक २६ जून रोजी कोल्हापूर रोडवरील छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि उपायुक्त नंदू परळकर व अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहायक आयुक्त विजय राजापूरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, अभियंता बाजी कांबळे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, सहायक लेखा परीक्षक धनंजय पळसुळे, शीतल पाटील, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी, महिला व बाल विकास अधिकारी बेबी नदाफ, भांडार अधीक्षक सुजाता दाभोळे, सुनील बेलेकर, सदाशिव जाधव, गणेश शिंदे, सहायक क्रीडा अधिकारी संजय कांबळे, सचिन खोंद्रे, मनोज खंदारे, महेश बुचडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमातून छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण, आणि सर्वसमावेशक विचारांचा आदर्श घेऊन प्रशासन कार्यरत राहण्याचा संदेश देण्यात आला.