{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
इचलकरंजी / वृत्तसेवा
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ञ समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे, खासदार धैर्यशील माने यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माने यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्गठन करण्यात आलेल्या या समितीत खासदार धनंजय महाडिक हे सहअध्यक्ष असतील तर ज्येष्ठ संपादक प्रतापसिंह जाधव यांची या समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव शहाजहान मुलाणी यांच्या सहीने ३ जुलै रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात १२ फेब्रुवारी २००३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने केंद्र शासन व कर्नाटक शासन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात कायदेशीर सल्ला देण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ०३ जणांची तज्ञ समिती गठीत केली होती. त्यानंतर या समितीची पुर्नरचना करण्यात आली होती.
प्रा.एन.डी.पाटील, (अध्यक्ष, तज्ञ समिती) यांच्या निधनामुळे व शासन निर्णयान्वये नेमलेल्या ०२ समिती सदस्यांच्या राजीनाम्यामुळे तत्कालीन मंत्री (जलसंपदा) जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीची पुर्नरचना केली होती. दिनांक ३० जून २०२२ रोजी नवीन शासन अस्तित्वात आल्याने खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीची पुर्नरचना करण्यात आली होती.
त्यानंतर, अॅड. राम आपटे समितीचे सदस्य यांचे दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाल्याने पुढीलप्रमाणे तज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. धैर्यशील माने, संसद सदस्य,(अध्यक्ष) धनंजय महाडिक, संसद सदस्य (सहअध्यक्ष) प्रतापसिंह जाधव, संपादक दै. पुढारी (सदस्य), दिनेश लक्ष्मणराव ओऊळकर (सदस्य), पदसिद्ध अध्यक्ष, मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समिती, बेळगाव (सदस्य) अॅड. महेश बिर्जे (सदस्य) अॅड.र.वि.पाटील (विशेष निमंत्रित) प्रधान सचिव व वरिष्ठ विधी सल्लागार, विधी व न्याय विभाग(विशेष निमंत्रित)सचिव/ प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (सीमा प्रश्न) (सदस्य सचिव).
