
इचलकरंजी | येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये टेक्स्टाईल विभागात कार्यरत असणारे प्रा.जे.ए.अलासे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा.जाकिया अलासे हया गेली १९ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘ए नोवेल ऍपरोच टुवर्डस ऑब्जेक्टीव्ह इव्हॅलिशुएन ऑफ फॅब्रिक रिंकल्स युसिंग अर्टिफिसिएशल इन्टेलिजन्स’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी डीकेटीईचे इटीसी विभागप्रुख प्रा. डॉ एस.ए.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, विभागप्रमुख प्रा.डॉ. एस.ए.पाटील उपस्थित होते.