
इचलकरंजी/प्रतिनिधी –
गणेश आगमनावेळी आवाज मर्यादेचे उल्लंघन केलेल्या शहरातील तब्बल 27 मंडळांचे पंचनामे पोलिसांनी पूर्ण केले असून ध्वनीमापक मिटरचे नमुने आणि कारवाईचा प्रस्ताव न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
शहरात विविध ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करुन मिरवणूक सुरू असलेल्या साऊंडच्या दणदणाट प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. यामध्ये गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 5, शिवाजीनगरमधील 12 तर शहापूरमधील 10 मंडळांचा समावेश आहे.
इचलकरंजी उपविभागात गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत 154, शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 332 तर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 335 असे एकूण शहरात 821 तर कुरूंदवाड हद्दीत 516 आणि हुपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 286 मंडळांनी ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली आहे. यासाठी जल्लोषात मिरवणुका काढल्या होत्या. त्यात साऊंड सिस्टीमचा दणदणाट करणार्या मंडळांवर कारवाईची मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे. याची माहिती पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी दिली.