
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अध्यक्ष जयेश बुगड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपआयुक्त श्रीमती स्मृती पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील वाढती धूळ, हवेचा खराब होत चाललेला दर्जा यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महापालिका प्रशासनाने जल फवारणी (वॉटर स्प्रिंकलर) टँकरद्वारे मुख्य रस्त्यांची स्वच्छता करावी. त्याचाच एक भाग म्हणून हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर स्प्रिंकलर या टँकरद्वारे विविध प्रकारे रस्ता स्वच्छता व पाणी फवारणी करत हवेतील धुलिकण कमी करण्यासाठी हवेत पाण्याने फॉगिंग करणे, रस्त्यावरील धुली कण कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, रस्ते स्पिंकलद्वारे धुणे, डिव्हायडर धुणे, डिव्हायडरमधील झाडांना पाणी देणे तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये फायर फायटिंगसाठीसुध्दा या गाडीचा वापर करता येणे शक्य आहे, असे म्हटले आहे.
यावर उपआयुक्त पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. यावेळी जयेश बुगड, मनोज तराळ, उमाकांत दाभोळे, मोहन कुंभार, आदित्य पाटील, प्रवीण बनसोडे, राहुल गागडे, विष्णू पाखरे, हर्षवर्धन गोरे, प्रदीप कांबळे, अमित माछरे, आदित्य बनसोडे, विशाल शिरगावे, श्रेयश गट्टानी, रोहन कुंभार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.