
इचलकरंजी : जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या सुचनेनुसार विशेषतः महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत रक्त तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिराचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, प्र. उपायुक्त रोशनी गोडे, प्र. उपायुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. यासीन पठाण, डॉ. मीनल पडीया, डॉ. शोभा लांडे, डॉ. वैभव साळे यांनी महिलांची तपासणी केली आणि आवश्यकतेनुसार रक्त तपासणी केली. सुमारे ३५० महिला कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला कर संकलन अधिकारी अरिफा नुलकर, कार्यालयीन अधिक्षक प्रियांका बनसोडे, ग्रंथपाल बेबी नदाफ, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, विधी अधिकारी खदिजा सनदी, सुजाता दाभोळे आदी उपस्थित होते. महिला व बाल विकास विभाग प्रमुख सीमा धुमाळ, राजश्री जाधव, वैभव कांबळे, विद्या कुंभार आणि आरोग्य केंद्रातील तेजस सुतार, स्नेहल जाधव, सचिन लोले, प्रीती पाटील, जस्मिन मुजावर, सुनिता ऐवळे, स्नेहल गोसावी यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.
4o